Tuesday, October 16, 2012

टँगी पनीर (Tangy paneer)


              हल्ली रेसिपीज कॉपी करण्यापेक्षा मी स्व:तच विचार करून काहीतरी बनवायचा प्रयत्न करत असतो,
टँगी पनीर हा त्यातलाच एक यशस्वी प्रयत्न :) होय, हे नाव पण मीच दिले आहे. तर साहीत्य आनि त्याची कृती ही अशी.

कीती लोकांकरता?
===========
४ जणांकरता.

साहित्य:

कोरडा मसाला:
=========
२ चमचे काळी मिरी
२ चमचे बडीशोप
२ चमचे जीरे
२ दालचिनीचे तुकडे


ओला मसाला:
========
२०० ग्रॅम पनीर (थोडे मोठे चौकोनी/आयताकृती तुकडे)
२ कांदे
१ टॉमेटो
१/२ वाटी ओलं खोबरं
४-५ लसूण पाकळ्या
१ हिरवी मिरची
२ चमचे चिंचेचा कोळ
१ चमचा साखर
चवीपुरते मिठ


कृती:
===
१.कोरडा मसाल्याचे सर्व साहीत्य जरा कढईत भाजून घेणे (भाजलेल्या मसाल्यांचा वास सुटला की पूरे, काळं पडेस्तोवर नाही भाजयचा :) )
२.भाजलेल्या मसाल्याची पूड करून घ्यावी आणि बाजूला ठेवून द्या. पूड थोडी जाडसरच असावी.
३.आता ओल्या मसाल्याचे सगळे साहीत्या (चिंच आणि साखर सोडून) एकत्र करून त्याची मिक्सरमधून थोडी जाडसर पेस्ट बनवा.
४.कढईत १-२ चमचे बटर किंवा तेल घ्या आणि मध्यम आच ठेवा (तुम्हाला हवं ते, पणा बटरने जास्त मजा ये‍ईल).
५.बटर/तेल पुरेसे गरम झाले की त्यात प्रथम कोरडा मसाला टाका आणि थोडासा परतून घ्या, तेल फ़ार गरम असेल तर मसाला जळून जाईल त्यामूळे जरा काळजी घ्या.
६.आता ओला मसाला टाका आणि आच मोठी करून २-३ मिनीटे परता.
७.आता २ चमचे चिंचेचा कोळ टाका आणि २ चमचे साखर, मग अर्धा कप (चहा पिण्याचा) पाणी टाका आणि मध्यम आचेवर ५-७ मिनीटे ठेवा.
८.एकदा चव घेऊन बघा, कांद्याचा तिखटपणा अथवा कडवटपणा जाणवत नसेल तर व्यवस्थित झालयं असं समजा, नाहीतर मग अजून थोडा वेळा मध्यम आचेवर ठेवा.
९.आता पनीरचे तुकडे टाका आणि १-२ मिनीट ठेवून गॅस बंद करा आणि कढईवर झाकण ठेवा.

काही सुचना:
========
१.चिंच आणि साखर ही तुमच्या हिशोबाने वापरायची आहे, आंबट-गोड चव असल्याशी मतलब, जर जास्त चिंच पडली तर त्या प्रमाणात साखरपण वाढवा. साखरेऐवजी गूळ वापरला तरी काही हरकत नाही (मी साखर वापरली, पण तुम्ही प्रयोग करू शकता :) )
२.ही ग्रेव्ही थोडी घट्ट असते, तुम्हाला हवं असेल तर थोडं पाणी जास्त टाकू शकता.
३.शक्त्यतो लिंबू पिळू नका कारणा त्याने लिंबाची चव जास्त हो‍ऊन तुमच्या मसाल्याची गंमत निघून जाईल.

कधी प्रयत्न केलात तर अभिप्राय जरूर कळवा :)

No comments:

Post a Comment