Tuesday, October 16, 2012

एनचिलाडाज्‌ (Enchiladas)


एनचिलाडाज्


बऱ्याच दिवसांपासून हा पदार्थ डोक्यात घोळत होतापण मुहुर्त काही लागत नव्हतातन्मयच्या अर्धांगिनीने त्याच्यासाठी खास हा पदार्थ बनवला आणि बासा माझ्या डोक्याने एनचिलाडाज्‌ करायचचं असं पक्क ठरवून टाकलंह्या पदार्थासाठी मुख्य अडचण होती ती म्हणजे टॉर्टीला (मक्याच्या विशिष्ट पिठापासून तयार केलेली पोळी), ती कुठेही मिळेनातन्मयच्या सौ.कडून असे समजले की टॉर्टीलाज दोराबजीमधे मिळतातमग काय मी आणि अनुष्का शनीवारी संध्याकाळी दोराबजीमधे हजर झालोमला सर्वात पहीले माझ्या आवडीचे ओरिगानो मिळाले आणि मी एकदम खूष झालोमला ओरिगनो प्रचंड आवडतंफ़िरत फ़िरत फ़ायनली मला टॉर्टीलाज दिसले पण लगेच मी ते खाली टाकून दीले३५०रुबघितल्यावर माझे डोळे पांढरेच झालेअजून काही खरेदी करून उदासमनाने मी आणि बायको परत घरी जायला निघालोतरी नशीब कयानीचा फ़्रुट केक आणि मॅकडीचा बर्गर आधीच खाल्ला होता नाहीतर ते पण बेचव लागत होतंघरी येउन माझं मन मला खात होतं की "यार हात को लगा पर मूह को नही लगा! :(". मला काही स्वस्थ बसवेना...गर्जना तर करून बसलो होतो की मी एनचिलाडाज करणार आणि बेसिकवर घोडं साफ़ अडकलं होतं.

मग मी उचकलो आणि डायरेक्ट डेस्कटॉपसमोर जाऊन बसलोम्हटलं च्यायला टॉर्टीलाजपण घरीच बनवूयातबरीच शोधाशोध केल्यावर एक चांगली रेसीपी सापडलीत्यावरून टॉर्टीला कसे करायचे कळालेलगे हातो एनचिलाडाज्च्या - रेसीपी मिक्स करून माझी नवी रेसीपी बनवलीमला ह्याकामी माझ्या बायकोने टॉर्टीलाज लाटून देणे आणि संपुर्ण कीचन (भयानक राडा होणार असला तरीहीमाझ्या स्वाधिन करणे अशी मोलाची भुमिका बजावलीआईने सुद्धा टॉर्टीलाचे पीठ भिजवण्यासाठी दिलेल्या मदतीचा मी ॠणी आहे :)

सर्व यथासांग पार पडल्यावर कसोटीचा क्षण आला आणि सगळ्यांनाच पदार्थ आवडला आणि माझा जीव भांड्यात पडलाबघता-बघता सगळं एनचिलाडाज गट्टम झालं आणि ती चीजी चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळत आहेमाझ्याहातून  चुका झाल्याचसर्वात पहीली म्हणजे सॉस बऱ्यापैकी कमी पडला त्यामूळे पदार्थ थोडा कोरडा झालातसंच टॉर्टीला सॉसमधे बुडवता नाही आल्या :) दुसरं म्हणजे - टॉर्टीला थोड्या कडक झाल्या आणि सॉस आधीच कमी असल्याने रोल करताना तुटल्यापण बाकी टेस्ट लईच बेस्ट होतीमी सगळी रेसीपी दिलीच आहे प्रचंड कंड असेल तर नक्की ट्राय करा.

तर रेसिपी खालील प्रमाणेसर्वप्रथम ही रेसीपी संपुर्णपणे माझी नाही आणि ही ऑथेंटीक मेक्सिकन रेसीपीपण नाहीत्यामूळे मेक्सिकन रेसीपी येणाऱ्यांनी उगाच शिव्या  देता त्यांची रेसीपी शेअर करावी ही विनंतीरेसीपी मीच संपुर्णपणे इकडे तिकडे शोधा-शोध करूनथोडे माझे बदल करून एकत्र करून लिहीलेली आहे.

टॉर्टीला बनवण्यासाठी: ( इंच डायमिटर वाल्या)

तव्यावरील टॉर्टीला
तुम्ही सरळ बाहेरून विकत आणू शकता किंवा घरी बनवू शकता.
टॉर्टीला ह्या मक्याच्या विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या पिठापासून बनवतातत्या पिठाचे नाव "हरीना मासाअसे आहेपण ते मला काही मिळाले नाहीपण आपण मैदा आणि कॉर्नफ़्लोवर वापरून टॉर्टीला तयार करू शकतो.
 कप मैदा
 कप कॉर्नफ़्लोवर
 चमचा बेकींग पावडर
चवीपुरते मिठ
पीठ भिजवण्यासाठी पाणी
 चमचा तेल
तळणासाठी थोडे तेल.

क्रुती:
मैदाकॉर्नफ़्लोवरबेकींग पावडर आणि मिठ चाळून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा.
हळू हळू पाणी मिसळून पिठ मळायला सुरुवात करा.
सगळ्या गुठळ्या फ़ुटून पीठ मऊ झाले की त्यात  चमचा तेल मिसळा आणि पीठ मळत रहा.
पीठ जास्त कोरडे अथवा जास्त ओले नकोहे पाहण्यासाठी पिठाचा एक छोटा गोळा घेऊन तो तळहातावर दाबाजर कडा व्यवस्थित राहील्या तर ते पिठ योग्य आहे असे समजावेजर कडेला चिरा पडल्या तर थोडे पाणी घालून परत तपासावे.

कडा व्यवस्थित आहेत, ह्याचा अर्थ पीठ व्यवस्थित भिजलेले आहे
आता पीठ  तास झाकून ठेवावे.
.तासाभराने परत एकदा पिठ तपासून घ्यावे.
पिठाची सुपारी एव्हढी गोळी घेउन ती गोलाकार आणि थोडी पातळचं लाटावी पण  इंचपेक्षा जास्त मोठी नको.
तुमची पहीली टॉर्टीला तयार झालीअता ही टॉर्टीला तव्यावर हलकी भाजून घ्यावी. (तुम्ही अश्य टॉर्टीला भाजून फ़्रीजमधे - दिवस ठेवू शकता.
.ह्यानंतर ती थोडी शॅलो फ़्राय करून घ्यावी (भाजताना आणि तळताना ती फ़ुगणार नाही ह्याची काळजी घ्या)
तळताना टॉर्टीला कडक होणार नाही ह्याची काळजी घ्या (कारण नंतर त्या रोल करायच्या असतात)
१०.अता उरलेल्या पिठाच्या अश्या पद्धतीने टॉर्टीला बनवून घ्या.

भिजवलेले पीठ

लाटलेली टॉर्टीला

सॉस:
सॉसला ह्या डिशमधे फ़ार महत्व आहेडिशचा मेन पार्ट सॉस आहेत्यामूळे तो झक्कास जमलाच पाहीजे (म्हणजे बाकीचे दोष कळून येत नाहीत ;) )

तयार केलेला सॉस
साहीत्य:
 कांदा बारीक चिरलेला
 लाल टॉमेटो
 लसूण पाकळ्या
 चमचा आल्याची पेस्ट
 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
बारीक चिरलेली थोडी कोंथीबीर.
 चमचे टॉमेटो सॉस
 छोटा चमचा विनेगर
 चमचे तेल.
१०. चमचा कॉर्नफ़्लोवर

सॉसचे साहित्य
क्रुती:
घरी ओवन असल्यास १८० सेल्सियसवर प्री-हीट करावा आणि त्यात  टॉमेटो १० मिनीटस्‌ बेक करून घ्यावेतह्यामूळे टॉमेटोचे रस आतमधे मस्त मोकळे होतात आणि फ़्लेवर जास्त डेव्हलप होतो.
भाजलेले टॉमेटोची साल काढून नंतर छान प्युरी करून घ्यावी (ओव्हन नसल्यास टॉमेटो उकळत्या पाण्यात  मिनिटस टाकून लगेच बाहेर काढावे आणि साल काढून टाकून प्युरी बनवावी)
एका कढईत  चमचे तेल टाकून गरम करावे आणि त्यात लसूणा (ठेचूनघालावीमग आले आणि चिरलेली मिरची टाकून परतावेआलं-लसूणाचा वास सुटाला की मग त्यात कांदा टाकूनकांदा पारदर्शक होईपर्यंत परतावा.
आच मध्यम करून त्यात टॉमेटो प्युरी मिक्स करावी  व्यवस्थित ढवळून घ्यावे.
आता टॉमेटो प्युरीच्या समप्रमाणात पाणी घालावे ( कप प्युरीला  कप पाणे).
आता  चमचे टॉमेटो सॉस चमचा विनेगरआणि चवीपुरते टाकावेआणि चव घेउन पहावी (जरा आंबट लागल्यास  चमचा साखर घालावी)
वरील सर्व क्रुतीमधे आच पुर्णवेळ एकसारखीच ठेवावी नाहीतर टेस्ट बदलू शकते.
मध्यम आचेवर सर्व मिश्रण १५-२० मिनीटे ठेवावे.
१५-२० मिनीटस नंतर  चमचा कॉर्नफ़्लोवर अर्ध्या कप पाण्यात मिसळून सॉसमधे टाकावे आणि गॅस बंद करावा.


एनचिलाडाज:
आता फ़ायनली एनचिलाडाज बनवूयात :) मी स्टफ़ींगसाठी भाज्या वापरल्या (श्रावण आहे ना....), पण आपण काहीही वापरू शकतो अगदी हवे ते.

साहीत्य:
 मूठ मक्याचे दाणे
 मूठ बटाट्याचे छोटे चौकोनी काप
 मूठ गाजराचे छोटे चौकोनी काप.
 मूठ उभ्या चिरलेल्या सिमला मिरचीचे तुकडे.
 कप किसलेले चीज ( अमूलचे चौकोनी तुकडे वापरू नका ते अजिबात मेल्ट होत नाहीत),
कीसलेले चीज नसेल तर चीज स्लाइस चालतील.

स्टफ़िंगचे साहित्य

क्रुती:
.ओव्हन १८० सेस्लियसवर प्रीहीट करत ठेवा.
.सर्व भाज्या (सिमला मिरची सोडूनवाफ़वून घ्याव्या (  शिट्टी द्यावी)
.आता सॉसचे दोन भाग करावेत आणि एक भाग बेकींग ट्रे मधे सारखा पसरावाथोडा ओरिगानो भुरभुरावा

बेकिंगपॅनमधे पसरवलेला सॉस
.एक टॉर्टीला घ्यावीआणि ती उरलेल्या सॉसमधे बुडवावीएका ताटलीत घेउन त्याच्यात थोडे चीज आणि स्टफ़ींग भरावे, आणि हळूवार पणे दोन्हीबाजूने फ़ोल्ड करूनट्रेमधे ठेवावी ( कडा खालच्या बाजूने असाव्यात)

स्टफ़ करून फ़ोल्ड करण्याआधीची टॉर्टीला
.सर्व टॉर्टीला वरीलप्रमाणे ट्रेमधे ठेवून घ्याव्यात.
.आता उरलेले सॉस समप्रमाणात ट्रेमधे पसरावे आणि वरून उरलेले चीज पसरावे (चीजने सर्व झाकले गेले पाहीजे..)

पुर्णपणे चीजने झाकलेली डिश
.आता ट्रेवर ऍल्युमिनीयमची फ़ोईल लावावी- चिद्र पाडावीत आणि १८० सेस्लियसवर १५-२० मिनीटे बेक करावे.
फ़ॉइल लावलेला बेकिंगट्रे
.थोडा वेळ सेटल झाल्यावर गरमा गरम खावे.

प्रयत्न केलात तर मला जरूर कळवा.

बेक झालेले एनचिलाडाज

No comments:

Post a Comment